गुरूवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 188 कोरोनाबाधित वाढले, एकूण संख्या 30429

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) गुरुवारी 29 ऑक्टोंबर रोजी एकूण 188 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 53 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 161 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 5 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30429 इतकी झाली असून यापैकी 2660 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 2863 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 161 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 906 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 5 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 53 रूग्ण वाढले

पंढरपूर- गुरुवारी 29 ऑक्टोंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 8 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 45 असे 53 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 055 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 175 झाली आहे.एकूण 441 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5439 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

One thought on “गुरूवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 188 कोरोनाबाधित वाढले, एकूण संख्या 30429

  • March 17, 2023 at 4:33 am
    Permalink

    I went over this web site and I think you have a lot of superb information, saved to bookmarks (:.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!