पंढरपूर– डीव्हीपी ग्रुप संचलित धाराशिव साखर कारखाना युनिट 3 शिवणी (जा) या कारखान्याच्या 2020-21 च्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ या भागातील प्रगतशील शेतकर्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यंदा या कारखान्यात पाच लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचा मानस चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केला.
या पहिल्या गळीत हंगामाच्या शुभप्रसंगी कारखान्या लगतच जिरगा मारूतीच्या मंदिरात अभिषेक करण्यात आला. काटा व ऊस भरून आलेल्या वाहनांचे पूजन करून गव्हाणीत ऊसमोळी टाकण्यात आली. कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी गव्हाणी मोळी टाकण्याचा मचू या परिसरातील प्रगतशील शेतकर्यांना दिला.
यावेळी शेतकरी कैलासगीर महाराज, व्यंकटराव आरसुळे, नामदेवराव गवते, तुकाराम लुटे, शिवाजी चव्हाण, रामराव वाके, व्यंकटराव कदम, एकनाथ ढोणे, ज्ञानेश्वर जामगे, नागनाथ कुसनुरे, नागोराव घुमे, पंढरी वानखेडे, रामराव पवार, गंगाधर बोमनाळे, ज्ञानेश्वर देसाई तसेच कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष काबंळे, सुहास शिंदे व गौरव दोशी, छावा संघटनचे माउली पवार हे उपस्थित होते.
यंदा पाऊसकाळ चांगला झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ऊस टनेजमध्ये ही भरपूर वाढ आहे. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने या भागातील सर्व शेतकर्यांचा ऊस या कारखान्यास गाळपास आणू. चांगला भाव देऊन येथील शेतकर्यांला सुजलाम सुफलाम करू अशी ग्वाही अभिजित पाटील यांनी दिली. पुढील काही दिवसात ऊस उतारा जास्त मिळावा यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा गावोगावी आयोजित करण्यात येणार आहेत. ज्युस ते इथेनॉलची ही प्रक्रिया सुरू करण्याचा मनोदय पाटील यांनी यावेळी बोलून दाखविला.
यावर्षी पाच लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मचारी व शेतकरी हा कारखानादारीचा कणा आहे. शेतकर्यांच्या हस्ते मोळी टाकून तर कर्मचार्यांना पगार वाढीची घोषणा चेअरमन अभिजीत पाटील यांनी यावेळी केली. याप्रसंगी या भागातील सरपंच, सदस्य, पत्रकार बांधव,कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.