थकीत करासाठी पंढरपूर नगरपरिषदेने तोडले 15 मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन , शहरात 2713 जणांकडे 17 कोटी ₹ थकबाकी

पंढरपूर – नगपरिषदेच्या वतीने शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकाकडून कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून शनिवारी 15 मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. शहरात पालिकेची जवळपास अठरा कोटी रूपये कर थकबाकी आहे.
कर संकलित करण्यासाठी विशेष वसुली पथकं तयार करण्यात आले असून यात 25 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये 19 हजार मालमत्ताधारक असून यातील काहीजणांकडे 13 कोटी तर 22 अधिकृत झोपडपट्या आहेत यात सहा हजार घरे असून यातील काही झोपडपट्टीधारकांकडे 4 ते 5 कोटी रु. कर येणे बाकी आहे. या थकीत मालमत्ताधारकाना यापूर्वी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 मधील कलम 150 अन्वये कराची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही 2 हजार 713 थकीत मालमत्ताधारकांनी कराची रक्कम न भरल्याने या मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व सूचना व पाणीनळ बंद करण्याची नोटिसा बजवण्यात आल्या होत्या. यानंतरही कराची रक्कम न भरल्याने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली पथकाने कार्यकारी अभियंता यांनी 19 मालमत्ताधारकांचे पाणी नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.
सदरची कारवाई वसुली लिपीक मंगेश परदेशी, सुरेश पवार, विजय ढवळे,पांडुरंग देवमारे,स्वप्निल नेहतराव,आदित्य लोंखडे यांनी केली आहे. नागरिकांनी आपली थकीत कर रक्कम भरुन नगपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!