दिलासादायक: जिल्हा ग्रामीणमध्ये 15 हजार 536 चाचण्यात 540 रूग्ण आढळले, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर मंदावला

पंढरपूर – गुरूवार 3 जून रोजी सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या आलेल्या कोरोना अहवालानुसार 15 हजार 336 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 540 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चाचण्या जास्त प्रमाणात होवून देखील रूग्णांची संख्या कमी म्हणजे केवळ 3.40 टक्क्यांच्या आसपास असल्याने ही ग्रामीण भागासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे.
गुरूवारच्या अहवालानुसार ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 15 हजार 536 चाचण्या घेण्यात आल्या यापैकी 14 हजार 996 चाचण्या या निगेटिव्ह आहेत तर 540 पॉझिटिव्ह आहेत. आज 919 जणांनी कोरोनावर मात केली तर 23 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये 1 लाख 25 हजार 74 रूग्ण आढळून आले असून यापैकी 2671 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 18 हजार 5 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 4 हजार 398 जण उपचार घेत आहेत.
आजच्या अहवालानुसार सर्वाधिक रूग्ण हे माळशिरस तालुक्यात 134 तर या पाठोपाठ पंढरपूर तालुक्यात 114 आढळून आले आहेत. तर माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात प्रत्येकी चार तर बार्शी तालुक्यात 3 जणांच्या मृृत्यूची नोंद आहे. गुरूवारी म्युकरमायकोसिसचे 13 रूग्ण आढळले आहेत. आजवर या आजाराचे एकूण 371 रूग्ण सापडले असून यापैकी 28 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 2 जण मयत आहेत.
दरम्यान जिल्हा ग्रामीणमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. 15 हजाराहून अधिक चाचण्या होवून ही 540 रूग्ण येथे आढळले असल्याने पॉझिटिव्हीटी दर कमी होताना दिसत आहे. गुरूवारच्या अहवालानुसार तो 3.40 टक्के इतका कमी झाल्याचे दिसत आहे.

3 thoughts on “दिलासादायक: जिल्हा ग्रामीणमध्ये 15 हजार 536 चाचण्यात 540 रूग्ण आढळले, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर मंदावला

 • March 7, 2023 at 3:25 am
  Permalink

  I just saw my progesterone result from cycle day 23 and it is 11 cialis 10mg 71 women randomised 65 analysed

 • March 28, 2023 at 6:58 am
  Permalink

  Современное словосочетание «магия искусства» применительно к древней ситуации может быть истолковано в прямом значении.
  Известно, что первобытные художники помещали
  изображения животных на самых
  темных и труднодоступных стенах пещер.
  Такие изображения имели своей
  целью заклясть животных, что говорит о сугубо практической установке – способствовать охоте, сделать ее максимально результативной.
  Как продавать онлайн – Бизнес-секреты

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!