दिवगंत आमदार भारत भालके यांच्या कुटूंबियांना विधानमंडळाचे स्मृतीपत्र सुपूर्द

पंढरपूर, दि. 27 :-महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा व विधानपरिषदेतील विद्यमान सदस्य अथवा माजी सदस्यांचे दु:खद निधन झाल्यास त्या निधनाबद्दल संबधित सभागृहात शोक प्रस्ताव संमत करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येते. त्याअनुषंगाने विधानमंडळाने तयार केलेले स्मृतीपत्र दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांना स्मृतीपत्र व विधानसभा सभागृहात झालेल्या शोकप्रस्तावाच्या कार्यवाहीची प्रत आमदार प्रशांत परिचारक व प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते श्रीमती जयश्री भालके यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, पोलीस निरिक्षक किरण अवचर, नायब तहसीलदार एस.पी.तिटकारे, सरपंच शिवाजी भोसले, भालके कुटुबीयांतील सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!