धाराशिव कारखान्याचे कामकाज व चेअरमन अभिजित पाटील यांचे साखर आयुक्तांकडून कौतुक

पंढरपूर – धाराशिव साखर कारखाना, युनिट क्र.३ मध्ये उत्पादित ४ लाख ९१ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन राज्याचे साखर आयुक्त श्री.शेखर गायकवाड व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संपूर्ण कारखान्याची त्यांनी पाहणी केली. साखर कारखानदारी अतिशय उत्तमरीत्या, सक्षमपणे चालवित असल्याबद्दल त्यांनी चेअरमन अभिजित पाटील यांचे कौतुक केले. हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालत असून अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि कुठेही गळती नसलेला असा कारखाना असल्याचे ते म्हणाले.

आपल्या कारखानाची साखर पांढरी शुभ्र, दाणेदार आणि उत्पादनही अत्यंत उत्कृष्ट असून या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना या कारखान्यातून न्याय मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भागातील शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न बंद कारखान्यामुळे ऐरणीवर होता. मात्र अभिजित पाटील यांनी हा कारखाना चालू करून तो प्रश्न मार्गी लावला आहे. असे गौरवौद्गार शेखर गायकवाड यांनी काढले.

याप्रसंगी श्री.वांगे , श्री. वाडीकर , कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. अमर पाटील, संचालक श्री. भागवत चौगुले, श्री. संजय खरात, श्री. दीपक आदमिले, प्रगतशील बागायतदार श्री. केरू सावकार, श्री. बाबा जामगे, ओंकार पाटील, गणेश रणदिवे, अक्षय रणदिवे,तसेच जनरल मॅनेजर ढाके, चिफ इंजिनिअर पवार, चिफ केमिस्ट पेठे , सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग व परिसरातील ग्रामपंचायत सदस्य मान्यवर, शेतकरी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!