धाराशिव साखर कारखाना युनिट १ च्या गळीत हंगामास सुरुवात, 4 लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट

उस्मानाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमी कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगार वाढ देण्यात आली आहे. या हंगामात चार लाख मे. टन उच्चांकी गाळप करण्याचा मानस आहे. कारखानावर कोविड सेंटरची सोय केली असल्याची माहिती धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी दिली.
डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव कारखान्याचा सन 2020- 21 च्या गळीत हंगामास रविवारी प्रारंभ झाला. प्रगतशील करा शेतकरी बाळासाहेब पाटील,धनंजय गायकवाड, अमोल जोगदंड, सुनील पाटील, प्रदीपनाना सस्ते, रवीराजे देशमुख, रणजित कवडे, भास्कर पुरेकर, तात्यासाहेब भिंगडे, महादेव कवडे, अनिल पाटील यांच्यासह समीर दुधगावकर, मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे, ॲड.विजय निरस, ॲड. विठ्ठल भिसे, पंढरपूरचे बाबूराव जाधव, आदिनाथ मुलाणी, कदम चोराखळीचे खंडेराव मैदांड, उपसरपंच पांडुरंग मैदांड, मनसेचे शशिकांत पाटील, सागर बारकुल, औदुंबर वाघ, ज्ञानेश्वर कांबळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष काबंळे, दीपक आदमिले, विकास काळे यांच्या उपस्थितीत काटा पूजन करून ऊस भरून आलेल्या वाहनांचे पूजन झाले व गव्हाणीत मान्यवरांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली.

अभिजित पाटील म्हणाले, गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील कारखाना चालवून येथील शेतकऱ्यांना, कामगारांना कारखान्याने न्याय दिला. गेल्यावर्षी सन २०१९-२०च्या हंगामात एफआरपी पेक्षा जास्त दर आपण दिला आहे. २५०० प्रति टन दर जाहीर केला पहिला हप्ता २१०० रू. तर पोळासणासाठी २०० रू प्रतिटन जमा करण्यात आले. अआतापर्यंत प्रतिटन २३०० रू. शेतकऱ्यांना अदा करण्यात आले असून उर्वरित रक्कम दिवाळीत दिली जाईल. यंदा निसर्गाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांत आनंदाचं वातावरण असून उसामध्ये टनेजचे चांगली वाढ आहे. शेतकऱ्यांनी जपलेल्या उसाला चांगला भाव दिला जाईल.
कारखान्यात कोविड सेंटर उभारण्यात आले असून कर्मचारी किंवा तोडणीतील कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास तत्काळ त्यांना कारखानावरच उपचारासाठी कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात येईल. बोलताना सांगितले
यावेळी कारखान्यातील सर्व अधिकारी,कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहन ठेकेदार, तोडणीदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!