पंढरपूरकरांसाठी दिलासादायक बातमी, 11 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

पंढरपूर,- शहरातील भक्तीमार्ग परिसरातील एका सोसायटीतील एका दोन वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील पाच व शहरातील अन्य सहाजणांचे स्वॅब तपासणीसाठी आरोग्य विभागाने पाठविले होते. याचा अहवाल प्राप्त झाला असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. दरम्यान यामुळे पंढरपूरकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

या बालकाच्या कुटुंबातील सदस्यांचे कालच स्वॅब घेण्यात आले होते. ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. हे बालक त्याच्या आई, वडिलांसह परदेशातून दोन आठवड्यापूर्वी भारतात परतले आहे. हे कुटूंब काही दिवस सोलापूर येथे विलगीकरणात होते तर नंतर त्यांना पंढरपूरला घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सोलापूर येथे असताना आई ,वडील व या बालकाचे स्वॅब घेण्यात आले. दरम्यान या बालकावर येथील एमआटीच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने शहरातील अन्य सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते त्याचा अहवाल ही निगेटिव्ह आला आहे.
भक्तीमार्ग परिसरात कोरोनाग्रस्त बालक सापडल्याने शनिवारी सकाळीच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित सोसायटी व आसपासचा परिसर निर्जुंतीकरण केला होता. तसेच तो ही भाग सील करण्यात आला आहे. घरोघरी जावून नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बजरंग धोत्रे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा वकर्स यांच्याकडून प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान आता या बालकाच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने सील केलेला भक्तीमार्गावरील परिसर लवकरच खुला केला जाणार आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!