पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे ! मविआच्या बैठकीत एकमत; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

मुंबई – राज्यातील महामंडळाचे वाटप येत्या पंधरा दिवसात पूर्ण केले जाणार असून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्षपद काँग्रेस तर शिर्डी देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल ,
अशी चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीत झाली. यावर एकमत झाले असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे घेणार आहेत.
१५ दिवसात महामंळ गठीत होतील यात मविआच्या ३ पक्षांसह अपक्षांना ही सामावून घेतले जाणार आहे. विधानसभेचे रिक्त सभापतिपदी काँग्रेसलाच संधी मिळेल. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!