पंढरपूरचे सुपूत्र नितीन खाडे आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी

पंढरपूर– मूळचे पंढरपूरचे व सध्या आसाममध्ये कार्यरत असलेले नितीन शिवदास खाडे ( आयएएस ) यांची आसाम सरकारच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. आसाम विधानसभेच्या निवडणुका एप्रिल-मे 2021 मध्ये होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा राबवणे आव्हानात्मक असणार आहे.

श्री. खाडे यांनी पुणे येथून लॉ ची पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. आसाम मध्ये विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम पाहिले आहे. महाराष्ट्रात बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , पुणे परिवहन सेवेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक म्हणून देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सध्या ते आसाम मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या उत्तम कामाची दखल घेऊन भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने त्यांची आसाम सरकारच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी नियुक्ती केली आहे.
नितीन खाडे हे श्री विठ्ठल सहकारी आणि चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक कै. एस. डी. खाडे यांचे पूत्र आहेत.

290 thoughts on “पंढरपूरचे सुपूत्र नितीन खाडे आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!