पंढरपूरच्या ग्रामीण भागात रॅपिड अँटीजेन टेस्ट मोहीम ; आज 175 चाचण्या झाल्या
पंढरपूर दि.6– जिल्ह्यासह तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना शबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आजाराची लक्षणे असणाऱ्या व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम राबविणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तालुक्यात भोसे, खेडभोसे व रोपळे येथे रुग्ण सापडल्याने त्यांच्या संपर्कातील नागरिकांची व आजाराची लक्षणे असणाऱ्या नागरिकांची ॲन्टीजेन टेस्ट घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये आज 175 रॅपिड ॲटिजेन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी ज्यांना आजाराची लक्षणे आहेत तसेच कोरोनाच्या संपर्कात आले नागरिकांनी पुढे येवून आपली आरोग्य तपासणी करावी जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग तत्परतेने रोखण्यासाठी आणि बाधितांना तत्परतेने उपचार सुरु करणे शक्य होईल असे गटविकास अधिकारी घोडके यांनी सांगितले.
जे नागरिक आजाराची लक्षणे अथवा कोरोना बाधितांच्या संपर्कात असून देखील तपासणीसाठी पुढे येत नाहीत अशा नागरिकांसाठी शोध मोहिम राबवून जवळच्या प्रांथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली जाणार आहे. ही मोहीम तालुक्याच्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांत राबविण्यात येणार आहे.ज्यांना सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास अशी लक्षणे आढल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही गटविकास अधिकारी घोडके यांनी केले आहे.
Nolvadex tamoxifen is a pill that can be taken by mouth cheap cialis