पंढरपूरमधील कोरोनाबाधितांच्या एकूण आकडेवारीची पन्नाशी पार, रात्री ४ नव्यांची भर

पंढरपूर – रविवारी रात्री आलेल्या अहवालनुसार पंढरपूर शहरात ४ नवे कोरानाबाधित रूग्ण आढळून आले आहेत, यामुळे येथील रुग्णसंख्येने आता आकडेवारीची पन्नाशी पार केली आहे. एकूण रूग्णसंख्या ५३ झाली आहे. शहरात आतापर्यंत ३३ तर ग्रामीण मध्ये १३ व इतर तालुक्यातील ७ जणांचा यात समावेश आहे.

शहरातील मंदिर परिसरात १ रुग्ण काल आढळून आला आहे. याचबरोबर रोहिदास चौक परिसरात २ तर झेंडेगल्लीत १ जणाला कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण विलगीकरणात होते. त्यांना वाखरी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

यातील ३ रूग्ण हे यापूर्वी बाधितांच्या संपर्कातील आहेत तर १ नवीन असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. दरम्यान या ४ नवीन रुग्णांना काल रात्रीच कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

आता अँक्टिव्ह रुग्णात पंढरपूर शहरातील २०, ग्रामीण ६ तर इतर तालुक्यातील ५ अशा ३१ जणांचा समाशेश आहे. २१ जण उपचारानंतर घरी गेले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!