पंढरपूरमध्ये आज 45 जणांनी केली कोरोनावर मात, आजवर 192 जण उपचारानंतर घरी परतले

पंढरपूर, – कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही लक्षणीय आहे. पंढरपूरमध्ये मंगळवारी एकाच दिवशी 45 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आजवर 192 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. येथील उपजिल्हा रूग्णालयासह जनकल्याण हॉस्पिटलमधून ही प्रत्येक एका रूग्णाने कोरोनावर मात केली आहे.
पंढरपूरमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. ही संख्या चारशेच्या पुढे गेले असली तरी बरे होणार्‍या रूग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. वाखरी येथील कोविड केअर सेंटरमधून मंगळवारी एकाच दिवशी 43 जणांना डिसार्च देण्यात आला आहे. तर आज जनकल्याण हॉस्पिटल व उपजिल्हा रूग्णालयातून प्रत्येक एकजण कोरोनावर मात करून घरी गेल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले. मंगळवारी उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेवून पहिला रूग्ण घरी गेला असून त्यास निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, रूग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, डॉ. दिलीप धोत्रे, डॉ. प्रदीप केचे, डॉ. भातलवंडे, लखन माने व रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंढरपूरच्या प्रशासनाकडून खूप प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधित सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांना तातडीने विलगीकरणात ठेवले जात आहे. यासाठी शहर व आजुबाजूच्या भागात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. वाखरी एमआयटीच्या कोविड केअर सेंटरमधून आजवर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी 26 जणांना घरी सोडण्यात आले होते. तर आज मंगळवारी 45 जण बरे झाले आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!