पंढरपूरमध्ये रविवारी 9 कोरोना रूग्ण वाढले, एकूण संख्या 359

पंढरपूर – आज रविवारी 26 जुलै रोजी पंढरपूर शहर 7 व ग्रामीणमध्ये 2 असे 9 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 359 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
आज 81 अहवाल मिळाले पैकी 72 निगेटिव्ह आहेत. 9 पाँझिटिव्ह आहेत. अद्याप 275 अहवाल प्रलंबित आहेत. ग्रामीण भागात मेंढापूर व नारायण चिंचोली येथे प्रत्येकी 1 रूग्ण आढळला आहे.
आज 26 जणांनी कोरोनावर मात केली आहे , त्यांना घरी पाठविण्यात आले. आजवर 120 जण बरे झाले आहेत. तर 5 जण मयत आहेत. शहरातील 164 तर ग्रामीण मधील 68 व इतर तालुक्यातील 2 असे 234 जणांवर उपचार सुरू आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!