पंढरपूर – सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पंढरपूर तालुक्यात असून बुधवार 25 नोव्हेंबर रोजी येथे आणखी 62 रूग्णांची भर पडली असून एकूण बाधितांच्या आकडा 7082 इतका झाला आहे. मागील चार दिवसात पंढरपूर तालुक्यात 223 रूग्ण वाढले आहेत.
आज पंढरपूर शहरात 15 तर ग्रामीण भागात 47 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता पंढरपूरमधील कार्तिकी यात्रा प्रतीकात्मक स्वरूपात भरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येथे भाविकांची गर्दी होवू नये यासाठी मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून दोन दिवसांची संचारबंदी पुकारण्यात आली आहे. तसेच श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून लॉकडॉऊनच्या काळात येथील मंदिर बंदच होते. ते आता दिवाळी पाडव्यापासून सुरू झाले आहे असले तरी लगेचच कार्तिकी यात्रा आली आहे. सध्या सर्वत्र दिवाळीनंतर कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढताना दिसत असून यास पंढरपूर अपवाद नाही. यामुळे येथील यात्रा प्रतीकात्मक स्वरूपात साजरी होत आहे.
मागील चार दिवसात पंढरपूर शहर व तालुक्यात 223 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. रविवारी 62, सोमवारी 38 तर , मंगळवारी 61 तर आज बुधवारी 62 कोरोनाबाधित येथे आढळून आले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण हे पंढरपूर तालुक्यात 7 हजार 082 इतके आढळून आले आहेत. तर सर्वाधिक कोरोनामुळे मृत्यूही याच तालुक्यात 210 नोंदले गेले आहेत. या आजारावर मात करणार्यांची संख्या 6398 इतकी असून सध्या 474 जणांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाचे रूग्ण ग्रामीणपेक्षा कमी आढळून आले आहेत. आजवर पंढरपूर शहरात 3053 तर ग्रामीणमध्ये 4029 कोरोनाबाधितांची नोंद आहे. जिल्ह्यात सोलापूर शहरानंतर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पंढरपूर तालुकाच आघाडीवर आहे. यानंतर बार्शी व माळशिरस तालुक्याचा क्रमांक लागतो.
I found your blog web site on google and check just a few of your early posts. Continue to keep up the superb operate. I simply extra up your RSS feed to my MSN News Reader. In search of forward to reading more from you afterward!…
Leave a Reply
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!
I found your blog web site on google and check just a few of your early posts. Continue to keep up the superb operate. I simply extra up your RSS feed to my MSN News Reader. In search of forward to reading more from you afterward!…