पंढरपूर तालुका ग्रामपंचायत निवडणूक : परिचारक गटाला चांगले यश, स्थानिक पातळीवर आघाड्यांचा बोलबाला; काही ठिकाणी दिग्गजांना हादरा

पंढरपूर – ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात पंढरपूर तालुक्यात परिचारक गटाचे वर्चस्व दिसत असून गावोगावी या गटाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी आघाड्या करून विजय मिळविला आहे. कासेगावसारख्या मोठ्या गावात परिचारक व भालके गटाचे नेते एकत्र आले तेथे त्यांनी 14 जागा जिंकल्या आहेत. तर खर्डीत या गटांनी पंधरा जागांवर निविर्वाद विजय मिळविला आहे. भाळवणीत परिचारक गटाने काळे व शिवसेनेशी हातमिळवणी करून 14 जागा जिंकल्या आहेत. करकंब येथे भालके गटाने नऊ जागा जिंकत ग्रामपंचायत राखली आहे. वाखरीत भालके-परिचारक (गोसावी गट) एकत्र होते. येथे त्यांनी नऊ जागांवर विजय मिळविला आहे.
रोपळे या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीने 13 जागा जिंकत सत्ता मिळविली आहे. पिराची कुरोली ग्रामपंचायतीमध्ये भालके, काळे व परिचारक, शिंदे सारे समर्थक एकत्र आले होते त्यांनी 13 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढ्याचा आवताडे गट पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात आपले वजन वाढवित असल्याचे दिसत आहे. सिध्देवाडी, गोपाळपूरसह अन्यत्र या गटाने आपली ताकद दाखवून देण्यास सुरूवात केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक या पक्षपातळीवर होत नाहीत तर स्थानिक प्रश्‍नांवर तेथील प्रत्येक गटाचे समर्थक आपआपल्या सोयीने आघाड्या करत असतात. तालुक्याच्या राजकारणात मुरलेल्या परिचारक गटाच्या समर्थकांनी गावोगावी अशा आघाड्या केल्याचे दिसत आहे.
परिचारक गटाचे खंदे समर्थक पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांच्या सुस्ते ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून जवळपास 40 वर्षे येथे त्यांचे वर्चस्व होते. अनेकवेळा विरोधकांनी प्रयत्न करूनही हा गड अभेद्य राहिला होता. यावेळी सर्वपक्षीय युवक आघडीने येथे 13 पैकी 8 जागा जिंकल्या असून घाडगे गटाला 5 जागा मिळविता आल्या आहेत. सोनके ग्रामपंचायतीवर भालके – काळे गटाने वर्चस्व मिळविले असून त्यांना 6 तर परिचारक गटाने 5 जागा जिंकल्या आहेत.उपरी गावामध्ये सत्तापरिवर्तन झाले असून काळे – भालके 11 पैकी 6 जागा जिंकत सत्ता मिळविली आहे तर परिचारक – भालके गटास 5 जागा जिंकल्या आहेत. तावशी मध्ये भालके – परिचारक गटाने 11 जागा जिंकल्या आहेत तर अवताडे गटाला 2 जागा मिळाल्या आहेत. रांजणी गावामध्ये परिचारक गटाने सहा जागा जिंकून सत्ता मिळविली आहे तर 5 जागा भालके गटाने जिंकल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्या सरकोलीमध्ये 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित 6 जागा सर्वपक्षीय आघाडीने जिंकल्या आहेत. देगाव ग्रामपंचायतीमध्ये 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या तर 5 जागा सर्वपक्षीय आघाडीने मिळविल्या आहेत.
चळे ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होती. येथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व परिचारक गटाचे दिग्गज नेते दिनकर मोरे, भालके गटाचे ज्ञानेश्‍वर मोरे यांच्या आघाडीने 8 जागा जिंकत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत परिचारक गटाचे येथील दुसरे नेते व पांडुरंग सहकारी चे संचालक हरीश गायकवाड यांनी मोरे यांना आव्हानं दिले होते. त्यांना पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. तिसंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काळे -भालके आघाडी 8 तर परिचारक गटाने 3 जागा जिंकल्या आहेत. भंडीशेगाव येथे भालके -परिचारक -काळे या गटांनी 11 जागा मिळाल्या तर काळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघडीला 2 जागा मिळाल्या आहेत. धोंडेवाडीत सर्वपक्षीय आघडीने 10 जागा जिंकल्या असून 1 ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. गोपाळपूर येथे परिचारक -भालके गटाने 12 तर विरोधी परिचारक, अवताडे, काळे गटाने 3 जागा जिंकल्या आहेत. येथे ही परिचारक समर्थक दोन आघाड्यांमध्ये विखुरले गेले होते.
कौठाळीत परिचारक – काळे गटाने 7 जागांवर विजय मिळविला आहे. खरसोळीमध्ये परिचारक – काळे गटाने 6 जागा तर विरोधी आघाडीने 3 जागा मिळविल्या आहेत. कान्हापुरीत परिचारक – आमदार शिंदे गटाने 6 तर परिवर्तन पॅनलने 3 जागावर यश मिळवले आहे. तारापूर ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गटाने 10 जागा जिंकत आपले वर्चस्व सिध्द केले आहे तर काळे गटाला 1 जागा जिंकली आली आहे. करोळेत 4 जागा बिनविरोध निवडल्य गेल्या होत्या तर येथे सर्वपक्षीय आघाडीने 7 जागा जिंकल्या आहेत.
बोहाळी ग्रामपंचायतीमध्ये भालके -काळे गटाने सहा जागा जिंकल्या असून येथे परिचारक गटास 5 ठिकाणी विजय मिळविता आला आहे आहेत. शेगाव दुमाला येथे 7 जागा भालके गटाने जिंकत ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे तर परिचारक गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. चिंचोली भोसे ग्रामपंचायतीमध्ये परिचारक – शिंदे आघाडीने सत्ता मिळविली असून त्यांना चार जागा जिंकता आल्या आहे भालके गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. आढीव ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाले असून येथे परिचारक- भालके – काळे या आघाडीने अकरा पैकी 10 जागा जिंकल्या तर एक जागा 1 मताने अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे. शेळवे गावात परिचारक गटाने सत्ता राखली असून येथे या त्यांना 8 तर काळे- भालके 3 जागा जिंकल्या आल्या आहेत.
बाभुळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गटाने 8 जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे तर विरोधी भालके -काळे गटाने 2 जागा तर अपक्षाने 1 जागा मिळविली आहे. अनवली ग्रामपंचायतमध्ये स्वाभिमानी विकास आघाडी 9 ठिकाणी विजयी झाली आहे तर तर देशमुख – शिंदे आघाडीने 2 जागांवर विजयी मिळविला आहे. आव्हे ग्रामपंचायतीमध्ये परिचारक – काळे आघाडीने सत्ता मिळविली असून त्यांनी 8 जागा जिंकल्या आहेत तर भालके गट 1 जागेवर विजयी झाला आहे. उजनी वसाहत ग्रामपंचायतमध्ये सर्व 7 जागा परिचारक गटाने जिंकल्या आहेत.
सिद्धेवाडी ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाले असून परिचारक -अवताडे -काळे गटाने या गावात 11 जागा जिंकून सत्ता मिळविली आहे. येथे भालके गटाला एकही जागा मिळविता आली नाही. शिरगावमध्ये परिचारक गटाने 5 जागा तर सर्वपक्षीय गटाने 2 जागा जिंकल्या आहेत. उंबरे ग्रामपंचायतमध्ये परिचारक गट आठ ठिकाणी विजयी झत्तला असून त्यांनी येथे सत्ता मिळविली आहे तर 3 जागा स्थानिक कोरके गटाने जिंकल्या आहेत.
आंबे ग्रामपंचायतीमध्ये भालके गटाच्या युवा आघाडीने 7 जागा जिंकून येथे आपले वर्चस्व सिध्द केले आहे तर काळे – परिचारक गटाने 4 जागी विजय मिळविला आहे. खेडभाळवणीमध्ये भालके – परिचारक गटाने 5 जागा जिंकल्या आहेत तर विरोधात असणार्‍या भालके -काळे गटाने 4 जागा जिंकल्या आहेत. या ग्रामपंचायतीत भालके समर्थक दोन गटांनी वेगवेगळ्या राजकीय गटांशी आघाड्या केल्याचे दिसत होते. शेवते ग्रामपंचायतीमध्ये विठ्ठल कारखान्याचे संचालक दशरथ खळगे यांच्या गटाने 8 जागा जिंकून सत्ता मिळविली आहे तर 3 जागा परिचारक गटाला जिंकल्या आल्या आहेत.
ओझेवाडीमध्ये 7 जागा परिचारक गटाने जिंकल्या आहेत येथे ही या परिचारक समर्थकांनी दोन वेगवेगळ्या आघाड्या केल्याचे दिसत होते. ओझेवाडीत 4 जागा भालके -परिचारक गटाने जिंकल्या आहेत. मुंढेवाडीत 7 जागा नारायण मोरे – परिचारक गटाने जिंकल्या व सत्ता मिळविली आहे तर 4 जागा भालके – परिचारक गटाने मिळवल्या आहेत. येथे प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वाधिक 420 मते नोटाला मिळाली आहेत.
सोमवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीतील ग्रामपंचायतींमध्ये परिचारक गटाने बाजी मारली होती. पोहोरगाव, एकलासपूर, केसकरवाडी, भटुंबरे, आंबेचिंचोली, उंबरगाव येथे या गटाने सत्ता कायम ठेवली आहे. तर शेंडगेवाडी येथे परिचारक व काळे गटाची सत्ता आली आहे. सुपली येथे हनुमान ग्रामविकास आघाडीने परिचारक गटाचा पराभव करत करीत सर्व 9 जागा जिंकल्या होत्या.
शेंडगेवाडीत काळे – परिचारक आघाडीला 5 जागा तर अपक्ष 1 जागी विजयी झाला आहे. येथे 2 जागा बिनविरोध झाल्या होत्या. आंबेचिंचोलीमध्ये परिचारक गट 6, गोडसे गट 2 तर अपक्ष 1 सदस्य ठिकाणी निवडून आले आहेत. भटुंबरे येथे परिचारक गटाने 6 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे तर भालके -काळे गटास तीन जागा जिंकता आल्या आहेत. केसकरवाडीत परिचारक गटाने 6 जागा जिंकत आपले वर्चस्व कायम रखले आहे. येथे काळे गटाला 3 जागा जिंकता आल्या आहेत. पोहोरगावमध्ये परिचारक गटाला 6 तर विठ्ठल परिवारास 3 जागा मिळाल्या आहेत. येथील सत्ता परिचारक गटाकडे आहे. उंबरगाव येथे परिचारक -भालके आणि काळे गट आघाडी 1 जागा तर अपक्ष एका जागी विजयी झाला आहे.
सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी वाडीकुरोली ग्रामपंचायतीवर निविर्वाद वर्चस्व मिळविले असून सर्व 9 जागांवर विजय मिळवला आहे. काळे गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या गटाने येथे नऊही महिला उमेदवार दिल्या होत्या. कांताबाई सोनवले, अर्चना धनंजय काळे, लाडाबाई काळे, शोभा प्रकाश कुंभार, राजाबाई बजरंग काळे, अर्चना राजेंद्र काळे, जनाबाई रघुनाथ चव्हाण, सुनीता रामचंद्र काळे, सुप्रिया योगेश काळे या उमेदवार विजयी झाल्या आहेत.
शिरढोण ग्रामपंचायतीवर भालके-परिचारक गटाने विजय मिळविला आहे तर नांदोरे येथे परिचारक-काळे गटाने 4 जागा जिंकल्या असून आमदार शिंदे व भालके गटाला या ग्रामपंचायतीत 5 जागा मिळाल्या आहेत. नेपतगाव येथे स्थानिक आघाड्यांना प्रत्येकी 3 जागा मिळाल्या असून अपक्ष 1 ठिकाणी विजयी झाला आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्या चिलाईवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिचारक गटाने विजय मिळविला असून या गटाला पाच तर पवार गटाला चार जागा मिळाल्या आहे. देवडे ग्रामपंचायतीमध्ये 9 जागा काळे – भालके -परिचारक यांच्या महाआघाडीने जिंकल्या आहेत.
विटे ग्रामपंचायतमध्ये भालके गटास चार तर परिचारक गटाला तीन जागा जिंकता आल्या आहेत. येथे प्रभाग क्रमांक एकमध्ये इंदुमती वगसिद्ध पुजारी आणि रुक्मिणी बापू पुजारी या दोन्ही उमेदवारांना 144 समान मते मिळाल्याने येथे चिठ्ठी काढून उमेदवार निवडण्यात आला. यात रुक्मिणी बापू पुजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. भोसे ग्रामपंचायतीच्या अकरा जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. सहा जागांसाठी निवडणूक झाली. सत्ताधारी पाटील गटाने सर्व जागा जिंकल्या आहेत.

(नमस्कार ,प्रसिद्ध झालेली माहिती ही वेगवेगळ्या सुत्रांकडून गोळा केलेली आहे. काही बदल असल्यास जरूर निदर्शनास आणू द्यावे. आभारी आहे.)

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!