पंढरपूर तालुक्यातील तुंगत मंडलात 68 मि.मी. पावसाची नोंद

पंढरपूर – शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा शुक्रवारी ४ जून रोजी सायंकाळी दमदार हजेरी लावली असून एकूण 191 मिलीमीटर तर सरासरी 21.22 मि.मी. ची नोंद झाली आहे. सर्वाधिक तुंगत मंडलात 68 मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे.
मे व जून महिन्यात पंढरपूर व भागात मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली आहे. शुक्रवार सायंकाळी सोसाट्याच्या वार्‍यासह पर्जन्यराजा येथे बरसला. पंढरपूर शहरात 12 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. मंडल निहाय झालेले पर्जन्यमान पुढीलप्रमाणे- करकंब 24 मि.मी., पटवर्धन कुरोली 14, भंडीशेगाव 5, भाळवणी 9, कासेगाव 14, पंढरपूर 12, तुंगत 68, चळे 29 तर पुळूज 16 मि.मी.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!