पंढरपूर तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, 190 नागरिकांकडून 19 हजार रुपयांचा दंड केला वसूल

पंढरपूर, दि. 04 :- सोलापूर जिल्ह्यांत शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 190 नागरिकांकडून 19 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच विविध निर्बंधही घातले आहेत. तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील नागरिक विविध शासकीय कामाकाजासाठी तहसिल कार्यालय, पंचायत समितीमध्ये येतात. गर्दीमुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री व पंडित कोळी यांनी पथक तयार करुन विना मास्क तहसिल कार्यालय आवारात फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. संबधित नागरिकांकडून दिनांक 27 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत 9 हजार रुपये दंड वसून करण्यात आला. ग्रामीण भागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन 5 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच भंडीशेगांव, उपरी व गादेगांव या ठिकाणी तहसीलदार सुशील बेल्हेकर व गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांनी अचानक भेट देवून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन 5 हजार रुपयांचा दंड वसून केला. असा एकूण 19 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, विना कारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच कोरोनाबाबत प्रशासनाने वेळोवळी दिले सूचनांचेही पालन करावे अन्यथा साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल असे आवाहनही बेल्हेकर यांनी केले आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!