पंढरपूर तालुक्यात 1 हजार 309 नोंदीचे निर्गतीकरण : प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती

पंढरपूर, दि. 09:- फेरफार नोदींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचनेनुसार तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये तालुक्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत 1 हजार 309 नोदींचे निर्गतीकरण करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

जिल्ह्यासह तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती व्हावी यासाठी दिनांक 1 ते 10 फेब्रुवारी 2021 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात आले होते. पंढरपूर तालुक्यातील 9 मंडळातील 1 हजार 309 नोंदणीकृत व अनोंदणीकृत प्रलंबित नोदींचे प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये पंढरपूर -219, भाळवणी -132, कासेगांव-210,चळे 62, करकंब-148,तुगंत -77, पुळूज-56, भंडीशेगांव-262 तसेच पटकुरोली-143 मंडळातील प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली

तालुक्यातील नागरिकांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती होण्यासाठी तसेच फेरफार नोदींसाठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार विवेक साळुखे यांनी यावेळी केले.

या अभियानातंर्गत बुधावर दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी निकाली नोदींच्या प्रकरणांचे वितरण तहसिलदार विवेक साळुंखे यांच्या हस्ते प्रांत कार्यालय सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्यासह महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

2,387 thoughts on “पंढरपूर तालुक्यात 1 हजार 309 नोंदीचे निर्गतीकरण : प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती