पंढरपूर- पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक भाजपा संपूर्ण ताकदीनिशी लढवणार असून यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह समाधान अवताडे, अभिजीत पाटील व डॉ बी.पी.रोंगे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती भाजपाचे सोलापूर जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपाची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. यानंतर भेगडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रशांत परिचारक, धैर्यशील मोहिते पाटील, डॉ बी.पी.रोंगे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रणव परिचारक, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे आदी उपस्थित होते.
दरम्यान मागील काही दिवसापासून भाजपाच्या उमेदवारीवरून विविध तर्कविर्तक लावले जात होते. तर परिचारक यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली जाणार तसेच उमेश परिचारक हे नवीन उमेदवार असणार अशा चर्चा सुरू होत्या. परंतु आज पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशांत परिचारक यांच्यासह दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, उद्योजक अभिजीत पाटील व स्वेरी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांनी उमेदवारीची मागणी केल्याचे स्पष्ट केले. यामुळे आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. याबाबतचा अहवाल आपण प्रदेश भाजपाकडे देणार असल्याचे भेगडे यांनी सांगून यावर अंतिम निर्णय पक्ष घेणार असल्याचे स्पष्ट केले.
buy cialis pro Angular Chelitis