पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल , 22 इच्छुकांनी नेले 24 अर्ज

पंढरपूर. 23:- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी संतोष महादेव माने (अपक्ष) यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 23 मार्च 2021 रोजी 22 इच्छुक उमेदवारांनी 24 अर्ज नेले आहेत. यामध्ये संतोष महादेव माने, अब्दुलरोक जाफर मुलाणी, विनोद नानासाहेब कदम, रामचंद्र तात्या गंगथडे, संजय नागनाथ माने, बळीराम जालिंदर बनसोडे, नागेश प्रकाश पवार, ॲड. सिताराम मारुती सोनवले, ॲड.मल्लीकार्जुन सदाशिव टाकणे, महेंद्र काशिनाथ जाधव, सचिन हनुमंत गवळी, संदीप जनार्दन खरात, केदार शामराव चंदनशिवे, सचिन अरुण शिंदे, अशोक ज्ञानदेव वाघमोडे, सागर शरद कदम, गणेश शिवाजी लोखंडे, संजय चरणु पाटील, नामदेव शेरवप्पा थोरबोले, पंडीत मारुती भोसले तर बालम याकुब मुलाणी व अभिजीत ज्ञानेश्वर मोरे यांनी प्रत्येकी दोन अशा एकूण 22 इच्छुक उमेदवारांनी 24 उमेदवारी अर्ज घेतले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!