पंढरपूर पोटनिवडणूक : उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याच्या खर्च निरीक्षक शिल्पी सिन्हा यांच्या सूचना

पंढरपूर. १ :- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेतच प्रत्येक उमेदवारांनी खर्च करणे अपेक्षित आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा अशा, सूचना निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती शिल्पी सिन्हा यांनी आज दिल्या.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी गजानन गुरव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सुशिल बेल्हेकर, निवडणूक सनियंत्रण कक्षाचे संजय सदावर्ते, सचिन माने उपस्थित होते

श्रीमती सिन्हा बैठकीत यांनी सूचना दिल्या की, उमेदवारांकडून प्रचारासाठी विविध माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वृत्तपत्र, तसेच इतर माध्यमांचा जाहिरात तपशीलाची माहिती संबंधित पथकाने दररोज घ्यावी. सभा आणि मोर्चाच्या ठिकाणी व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथक कार्यरत ठेवावे. यासंबधीची सर्व माहिती खर्च विषयक नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावी. संशियत वाहनांची तपासणी व पैशाचा गैरवापर याबाबत भरारी पथकाने दक्षता घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करुन निवडणूक प्रक्रिया पार पाडावी तसेच निवडणूक विभागाच्या सर्व पथक प्रमुखांनी निवडणूक कालावधीत सतर्क रहावे. उमेदवारांनी निवडणूक खर्च वेळेत खर्च नियंत्रण विभागाकडे सादर करावा.

श्रीमती सिन्हा यांनी निवडणूक नियंत्रण कक्षास भेट देवून कामाकाज विषयक समाधान व्यक्त केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी निवडणूक बाबत तयारीची सर्व माहिती दिली. तत्पुर्वी शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे उमेदवारांच्या खर्चाबाबत विविध निवडणूक विभागाचे पथक प्रमुख यांचाही आढावा घेण्यात आला.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!