पंढरपूर पोटनिवडणूक :गुरुवारी 2 जणांची उमेदवारी दाखल ; 4 जणांनी अर्ज नेले

पंढरपूर – 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात होवू घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून गुरूवारी 4 जणांनी अर्ज घेतले आहेत,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
पंढरपूर पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असून गुरूवार 25 मार्च हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस होता. या दिवशी पिपल्स रिपब्लिक पार्टीचे महेंद्र काशीनाथ जाधव, रा. कासेगाव ता.पंढरपूर व अपक्ष संदिप जनार्दन खरात रा. माण ता.खटाव जि. सातारा यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तर गुरूवारी 1.मोहन नागनाथ हळवणकर रा. ईश्वर नगर , 2. धनाजी विष्णु गडदे रा. नंदेश्वर (यांनी बापू दादा मेटकरी यांच्यासाठी), 3.अमोल अभिमन्यू माने रा. सांगवी जि. पुणे, 4. सिध्देश्वर बबनराव आवताडे रा. मंगळवेढा. यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
दरम्यान आजवर या निवडणुकीसाठी 5 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर 40 जणांनी अर्ज नेले आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!