पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शिवसेनेची तयारी! शैला गोडसेंचे संपर्क कार्यालय सुरू

ही जागा शिवसेनेची होती..
दरम्यान शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांनी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना स्पष्ट केले की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची जागा यापूर्वी शिवसेनेची होती. युती झाल्यामुळे ही भाजपाला सोडावी लागली होती.सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र हे राजकारण आहे , कधी वेळ बदलेल हे सांगता येत नाही. जर स्वबळावर लढावे लागले तर शिवसैनिक नेहमीच तयार असतो.

पंढरपूर – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार कै. भारत भालके यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक होणार आहे. याबाबत सर्वच राजकीय पक्ष चाचपणी करत असून जाहीरपणे कोणी काहीही बोलण्यास तयार नाही. यातच आता शिवसेनेकडून गेले अनेक वर्षे या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करणाऱ्या शैला गोडसे यांनी आपले संपर्क कार्यालय रविवारी पंढरपूरमध्ये सुरू केले असून याचे उद्घाटन जिल्हा समन्वय प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेना व भाजपाच्या युती असताना पंढरपूरची जागा शिवसेनेकडे होती मात्र 2019 ला चर्चा करून सदरची जागा भाजपाला देण्यात आली होती. कारण त्यावेळी ज्येष्ठ नेते स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी भाजपाच्या तिकिटावर ही जागा लढण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीत या जागेवर भारत भालके हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते. आता त्यांचे निधन झाल्याने आमदारकीची जागा रिक्त आहे. येथे लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय हे घटक पक्ष आहेत. कै. भालके हे राष्ट्रवादीचे होते त्यामुळे सहाजिकच या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असणार हे निश्‍चितच आहे. यामुळे भालके यांच्या घरात राष्ट्रवादीने उमेदवारी मिळेल व महाविकास आघाडीचे घटकपक्ष दिलेल्या उमेदवाराला विजयी करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान आता शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी पंढरपूरमध्ये रविवारी 10 जानेवारी रोजी आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. गोडसे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांनी यासाठी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढविला होता तसेच मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्‍नासह विविध विषयांवर आवाज उठविला होता. मात्र 2019 च्या विधानसभेला ही जागा भाजपाकडे गेल्याने त्यांना निवडणूक लढविता आली नाही. मात्र आता त्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.
माजी जिल्हाप्रमुख सार्इनाथ अभंगराव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, 2019 ला या मतदारसंघातून शैला गोडसे यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती मात्र युती झाल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांच्यावर अन्याय झाला. ही जागा जरी राष्ट्रवादीची असली तरी निवडणूक लढवायची तयारी आपण ठेवली पाहिजे.
यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत , तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहरप्रमुख रवींद्र मुळे, ग्राहक संरक्षण जिल्हाप्रमुख जयवंत माने, अरुण कोळी , महिला आघाडी शहर प्रमुख पूर्वा पांढरे, उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे ,नाना सावंतराव, तानाजी मोरे, पंकज डांगे, सिध्देश्वर कोरे उपस्थित होते.

13 thoughts on “पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शिवसेनेची तयारी! शैला गोडसेंचे संपर्क कार्यालय सुरू

  • March 9, 2023 at 3:15 am
    Permalink

    Differential expression of hypoxia inducible factors related to the invasiveness of epithelial ovarian cancer how much does cialis cost The source data of quantitative analysis of cell percent that the TGF ОІR2 was concentrated in the primary cilia for Figure 8f

  • March 12, 2023 at 12:12 pm
    Permalink

    I have never seen such a beautiful site, I wish you luck

  • March 12, 2023 at 1:02 pm
    Permalink

    I have never seen such a beautiful site, I wish you luck

  • March 13, 2023 at 9:13 pm
    Permalink

    It was a great article, and I want to write and publish articles like you on my own site.

  • March 15, 2023 at 7:05 am
    Permalink

    I’ve been looking for such an explanatory article for days, finally I found it.

  • March 17, 2023 at 4:58 am
    Permalink

    Wonderful work! This is the type of info that should be shared around the web. Shame on the search engines for not positioning this post higher! Come on over and visit my site . Thanks =)

  • March 22, 2023 at 4:58 am
    Permalink

    doll house 168 リアルなダッチワイフの写真と画像(リアルショットの写真)ダッチワイフのような日常生活の存在はどのようにあなたのセックスラブドール体験を強化するためのアプローチイアンテ、ジャックビーニンブルによってチェックされた170cmのZ-Onedoll

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!