पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू, प्रांताधिकाऱ्यांनी घेतली बैठक

पंढरपूर – आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होत असून याची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. कोरोनाचे सावट पाहता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एक हजारापर्यंतच मतदान एका केंद्रावर घेता येत असल्याने आता होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी या मतदारसंघात मतदानकेंद्र वाढणार आहेत.

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक होणत्याही क्षणी लागू शकते. येथील आमदार कै. भारत भालके यांचे नोव्हेंबर 2020 मध्ये निधन झाले आहे. येथील पोटनिवडणुकीची तयारी सुरू असून प्रशासकीय पातळीवर याबाबत बैठका होत असून गुरूवारी 25 फेब्रुवारीला प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने 16 सप्टेंबर 2020 ला जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार एका मतदानकेंद्रावर जास्तीत जास्त एक हजार मतदान घेता येवू शकते. यामुळे र्इव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीन व मनुष्यबळ त्याच प्रमाणात लागणार असून पंढरपूर व मंगळवेढा या दोन तालुक्यात जवळपास दोनशे मतदानकेंद्र वाढू शकतात. याबाबतच या बैठकीत विचार केला गेला असल्याचे सांगण्यात आले. प्रांत कार्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासकीय तयारी बरोबरच आता या पोटनिवडणुकीची तयारी राजकीयक्षेत्रात देखील सुरू झाली असून आमदार कै. भारत भालके यांचे चिरंजीव हे दोन्ही तालुक्यात मतदारांशी संवाद साधत आहेत तर दुसरीकडे 2019 च्या निवडणुकीत अपक्ष लढलेले उद्योजक समाधान आवताडे यांचा ही पंढरपूर व मंगळवेढा भागात मतदारांशी संपर्क वाढला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भालके कुटुंबात उमेदवारी दिली जार्इल असे संकेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच मिळत आहेत.

11 thoughts on “पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू, प्रांताधिकाऱ्यांनी घेतली बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!