पंढरपूर – 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात होवू घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून बुधवारी 11 जणांनी 12 अर्ज घेतले आहेत,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
पंढरपूर पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असून बुधवार 24 मार्च हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता. या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सचिन अरूण शिंदे, रा. आंबे ता.पंढरपूर व अपक्ष संजय नागनाथ माने रा. कोर्टी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर बुधवारी 1.माणिक शिवाजी भुई रा. सरकोली,2. सिध्दाराम सोमण्णा काकणकी रा. सिध्दापूर, 3.जगन्नाथ दगडू डोके रा. माचणूर,4. बिराप्पा मधुकर मोटे रा. तनाळी, 5.सुदर्शन रामचंद्र खंदारे रा.पंढरपूर (दोन अर्ज) 6.सतीश विठ्ठल जगताप रा. इंदापूर, 7.पोपट हरी धुमाळ रा. बोहाळी, 8. मनोज गोविंदराव पुजारी रा. ब्रह्मपुरी, 9.किशोर सीताराम जाधव रा. गोपाळपूर, 10.इलियास युसूफ शेख रा. इसबावी तर 11.नागेश प्रकाश पवार यांनी महादेव काशीनाथ मोरे रा. पंढरपूर यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले आहे.
I see something genuinely interesting about your web blog so I saved to favorites.