पंढरीतील कलाकारांना मनसेची दिवाळी भेट

पंढरपूर- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कलाकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी स्थानिक गरीब व गरजू कलाकारांनी साखर, गरा,रवा,तेल,दाळ,साबण,उटणे या वस्तूंचे वितरण केले.
मागील आठ महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात स्थानिक कलाकारांची मोठी कुचंबणा झाली असून
आर्थिक अडचणीत असलेल्या या कलाकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आज येथील शंभरहून अधिक गरजू व गरीब कलाकारांना भेट देऊन दिवाळी गोड केली. ऐन दिवाळी मदत मिळाल्याने कलाकारांनी मनसे व धोत्रे यांचे आभार मानले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!