पंढरीत अर्बन बँक चौक – इं.गांधी चौक-सावरकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बफर झोन घोषित

पंढरपूर शहरात मुंबईतून आलेले दोन जण बुधवारी कोरोना पाँझिटिव्ह आढळले आहेत. ते खासगी शैक्षणिक संस्थेत प्रशासनाने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात होते. त्यांचा येथील रहिवासी पत्ता हा ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी असल्याने हा परिसर प्रशासनाने सील केला आहे. पंढरपूर अर्बन बँक चौक ते इंदिरा गांधी चौक ते स्वा. सावरकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा भाग बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. याबाबत प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आदेश जारी केले आहेत. या भागातील रस्ते बँरेगेट टाकून बंद करण्यात आले आहेत. या बफर झोन भागात दुकाने, बाजार , व्यापारी पेठ बंद आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!