पंढरीत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी स्वागतासाठी स्थानिक नागरिकांकडून फुलाच्या पायघड्या, रांगोळ्या

पंढरपूर- कोरोना विषाणूमुळे यंदा आषाढीची पायी वारी रद्द झाली आहे. मानाच्या पालख्या बसने आज दशमीला मंगळवारी पंढरपूरमध्ये आल्या आहेत. पंढरीत संचारबंदी आहे. दरवर्षी लाखो भाविकांसमवेत येणारी संत ज्ञानेश्वर महारांची पालखी यंदा मोजक्या वारकऱ्यांना घेवून पंढरीत आली आहे. नाथ चौकातील श्री ज्ञानेश्वर मंदिरासमोर स्थानिक भक्तांनी आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट करून पालखीच्या स्वागताची तयारी केली होती.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!