पंढरीत हाथरस घटनेचा रिपाइंकडून निषेध, तहसील कार्यालयासमोर निदर्शन

पंढरपूर – उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून यातील नराधम आरोपींना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, पीडित मुलीच्या कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकारने तत्काळ आर्थिक मदत द्यावी , अशी मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने करण्यात आली आहे.

याबाबत पंढरपूर येथील तहसील कार्यालयाबाहेर हाथरस घटनेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच प्रशासनास निवेदन देण्यात आले. यात या अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, उत्तर प्रदेशातील स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे , रिपाइंचे नेते सुनील सर्वगोड , दीपक चंदनशिवे , संजय सावंत ,कीर्तिपाल सर्वगोड , संजय माने ,संजय सावंत ,बाळासाहेब साखरे , अनिल सोनवणे ,ब्रह्मदेव वाघमारे , भारत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!