‘पक्ष अभिप्राय अभियानात’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चांगले योगदान, शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राबवलेल्या *’पक्ष अभिप्राय अभियानात’* युवक काँग्रेसने आपले चांगले योगदान दिल्याबद्दल राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी युवक काँग्रेसच्या तिन्ही अध्यक्षांचे अभिनंदन करत विशेष कौतुक केले आहे.

दरम्यान येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सत्कार करण्यात येईल असे आश्वासन जयंत पाटील यांनी तिन्ही युवक अध्यक्षांशी बोलताना दिल्याची माहिती युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत “पक्ष अभिप्राय” या डिजिटल अभियानाविषयी शुक्रवारी झूम व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली.

त्यानंतर बोलताना रविकांत वरपे यांनी या अभियानात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सर्वात जास्त १ लाख ८१ हजार २८७ डिजिटल अभिप्राय नोंदवल्याचे सांगितले.

राज्यातून प्रत्येक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा,शहरअध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या अभियानासाठी मेहनत घेतली त्यांचे देखील जयंत पाटील यांनी कौतुक केले.

विशेष म्हणजे या अभियानात सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आणि नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दुसरा क्रमांक पटकावला आहे.त्याबद्दल ही त्यांचे अभिनंदन केले.

या अभियानात मोलाची कामगिरी बजावलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आभार मानले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!