पत्रकार संतोष रणदिवे कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित

पंढरपूर – कोरोनाच्या संकटापासून दूर ठेवण्यासाठी लोकांना जागृत व योग्य, उपयुक्त माहिती पाठविण्याचे काम विविध क्षेत्रातील लोकांनी केले आहे. या कार्याची दखल घेत छावा क्षात्रवीर सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंढरपूर येथील दै.तरुण भारत संवादचे पत्रकार संतोष रणदिवे यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पंढरपूर ग्रमीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, क्षात्रवीर सेना संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे यांच्या हस्ते गुलाबपुष्प, सन्मानपत्र देऊन रणदिवे यांना गौरविण्यात आले.

संतोष रणदिवे यांनी कोरोना कालावधीत शेतकरी, व्यापारी, कामगा व कोरोना रुग्ण यांच्याविषयीच्या समस्या सरकार व प्रशासनाकडे बातमीच्या स्वरुपात मांडल्या. तर रुग्णालयातील कमतरता, आरोग्य विभागाकडून करण्यात येणा-या उपाययोजना, सुविधा यासंदर्भात माहिती देण्याचे त्यांनी काम केले आहे. याच कार्याची दखल छावा क्षात्रवीर सेनेकडून घेण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सतीश सौदागर, विद्यार्थी प्रदेश कार्याध्यक्ष विजय कदम, वारकरी प्रदेश कार्याध्यक्ष अच्युत गुरव, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष नौशाद शिकलकर उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!