पन्नालाल सुराणा यांची ‘अभिवंदन’ तर जगताप,निंबाळकर यांची उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी निवड

सोलापूर – छाया-प्रकाश फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘अभिवंदन’ पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत पन्नालाल सुराणा यांची तर उपक्रमशील शिक्षक आणि शिक्षिका म्हणून देविदास नवनाथ जगताप आणि विनया महेश निंबाळकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा आणि स्वाती शहा यांनी दिली.
शुक्रवार दि.९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता दूर-दृश्य (ऑनलाईन)प्रणालीच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल. या समारंभानंतर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ‘जनहित याचिका-इतिहास और भविष्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा यांनी आपल्या आई वडिलांच्या नावे स्थापन केलेल्या छाया-प्रकाश फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारा बरोबरच सोलापूर जिल्ह्यातील हुशार आणि गरजू अशा पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना घसघशीत शिष्यवृत्ती दिली जाते.
‘अभिवंदन’ पुरस्कार हा ५१ हजार रुपये रोख आणि मानपत्र असा असेल तर ‘उपक्रमशील’ शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे,प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि मानपत्र असे स्वरूप असेल.
पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील पाटील वस्ती वरील प्राथमिक शाळेत देविदास जगताप अध्यापन करतात, तर विनया निंबाळकर या बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील स्नेहग्राम च्या माध्यमातून वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या अध्यापना बरोबरच सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.
पुरस्काराचा आणि व्याख्यानाचा हा संपूर्ण सोहळा सोशल मीडिया वरून ऑनलाइन प्रसारित होईल. या शिवाय सोलापुरातील स्थानिक केबल बी. आर.नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून ऑनलाइन प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी
Https://us02web.zoom.us/j/84124033904¿pwd=bDK3SDJ3Y2K4ZXdSbjZ5UjFXOHNCdz09
Meeting code: 84124033904
Passcode: 227052
Live broadcast: B R news channel( BRDS cable network ch no.102)
Subscribe B R news youtube channel
या लिंक वरून सोहळ्यात सहभागी व्हावे. असे आवाहन निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा आणि स्वाती शहा यांनी केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!