परिचारक व मोहिते पाटील यांचे मनोमिलन

पंढरपूर- गेली दहा वर्षे एकमेकांपासून दुरावलेल्या मोहिते पाटील व परिचारक गटांचे मनोमिलन पंढरीत झाल्याचे चित्र आज दिसत होते. येथे माढा व सोलापूर मतदारसंघातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित मेळावा झाला. यास माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना मोहिते पाटील यांनी सुधाकरपंत परिचारक यांचा उल्लेख आमचे नेते असा केला. यावेळी त्यांनी परिचारक व मोहिते पाटील यांच्या तीन पिढ्यांच्या संबंधाचा उल्लेख करत आपण पंतांच्या नातवासारखे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पंतांनी आपणास 20 वर्षापूर्वी अपमान चघळायचा नाही तर गिळायचा असतो अशी शिकवण दिल्याचे सूचक विधान केले. यानंतर रणजितसिंह यांनी पंतांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. यानंतर मोहिते पाटील व आमदार प्रशांत परिचारक हे एकत्रितपणे वाहनापर्यंत चर्चा करत गेले

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!