पुणे विभागातील कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती

पुणे दि.12: – पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या, परराज्यात होणारे मजूर स्थलांतर, मजुर तसेच प्रवाशी संख्या विचारात घेता रेल्वेगाडीचे नियोजन, राज्यांतर्गत प्रवाशांचे नियोजन, प्रतिबंधीत क्षेत्र, रेड, ग्रीन व ऑरेंज झोनमधील सद्यस्थिती, ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी चाचणी, रुग्णसंख्या लक्षात घेता बेड क्षमतेत वाढ, केशरी व अंत्योदय योजनेतील धान्य वाटप तसेच सातारा व सोलापूर जिल्हा पाहणी करून प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज सविस्तर माहिती दिली.
पुण्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या,मजूर स्थलांतर व प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे जिल्हयासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्हयातील उपाययोजनाबाबतचा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी मजूर स्थलांतराबाबत तसेच गावी गेलेल्या व जाण्याची मागणी केलेल्या विद्यार्थी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पिंपरी- चिंचवड तसेच ग्रामीण क्षेत्रातील उद्योगाबाबत सविस्तर माहिती दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगवेळी पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे यांच्यासह इतर विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!