पुणे विभागात कोरोना बाधित 809 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि.20 :- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 809 झाली असून विभागात 107 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 647 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकुण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 23 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 809 बाधित रुग्ण असून 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 734 बाधीत रुग्ण असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 25 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 9 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 9 हजार 534 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 9 हजार 10 चा अहवाल प्राप्त आहे. 523 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 8 हजार 154 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 809 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 42 लाख 37 हजार 758 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 60 लाख 82 हजार 664 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 882 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
he blog was how do i say it… relevant, finally something that helped me. Thanks