पुराणापासून कलीयुगापर्यंत स्त्रीचे समाजसुधारणेत योगदान

सौ. वीणा व्होरा, पंढरपूर 
सा, रे,ग,म, प,ध आणि नि.. या संगीतामधील सात स्वरांशी स्त्री चे नाते  घट्ट आहे. यात सा म्हणजे साधेपणा, रे म्हणजे ऋजुता, ग म्हणजे गुणवत्ता, म म्हणजे मार्दव, प म्हणजे पंचतत्व, ध म्हणजे धैर्य आणि नि म्हणजे निगर्वीपणा असे हे स्त्री स्वभावाचे आगळेवेगळे सप्तक आहे.
स्त्रियस्यः चरित्रमं पुरूषस्य भाग्यम् । असे म्हणतात. स्त्रियांचे चारित्र्य म्हणजे पुरूषांचे भाग्य असते. कारण या विश्‍वामध्ये मनुष्य जन्माची उत्पत्ती स्त्रीपासूनच झाली आहे. पुराणापासून ते आजच्या कलीयुगापर्यंत असंख्य स्त्रियांची  योगदाने आपण ऐकत आलो आहोत. स्त्री एकाच वेळी मुलगी,आई, पत्नी, सून अशा अनेक भूमिका निभावत असते. पुत्रणे दुहिता समा..म्हणजे मुलगा मुलगी समान. असे स्पष्ट विधान आपल्या पुराणात आढळून येते.
ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा..असे माउलींना उपदेश करणारी संत मुक्ताबाईच होती. तर संत जनाबाई, संत बहिणाबाई या महिलांनी आपल्या उपदेशातून जनजागृती केली. राष्ट्रमाता जिजाऊ, चांद बिबी, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक महिलांच्या शौर्यगाथा इतिहासात उल्लेखनीय आहेत. कस्तुरबा गांधी, मदर तेरेसा, मादाम कामा, सरोजनी नायडू, इंदिरा गांधी, मेधा पाटकर, मृणालिनी गोरे, प्रतिभा पाटील, मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी यांनी राजकारणात आपले स्थान सिध्द केले आहे. तर मेरी कोम, सानिया मिर्झा, पी.टी.उषा, साइना नेहवाल, पी.व्ही.सिंधू अशा अनेक महिला खेळाडू जगप्रसिध्द झाल्या आहेत. तर लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले यांनी संगीतातील कारकिर्द गाजविली आहे. अंतराळातून भ्रमण करणार्‍या कल्पना चावला, सुनिता विल्ययमस् या मुळच्या भारतीयच आहेत.
आठ मार्च दरवर्षी महिला दिन म्हणून साजरा करण्याचे कारण म्हणजे तो श्रमिक महिलांच्या लढ्याचे स्मरण आहे. याच दिवशी 1974 मध्ये अमेरिकेच्या व्हिएतनाम वरील हल्ल्याच्या वेळी तेथील स्त्रियांनी सार्वजनिक निषेध केला. आठ मार्च 1943 ला भारतात मुंबई येथे ब्रिटिश सत्तेविरोधात एकत्र आल्या होत्या. आठ मार्च 2000 ला जागतिकीकरणाच्या विरोधात जागतिक महिला जागरण अभियान सार्‍या विश्‍वात सुरू झाले. अशा या स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा…
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!