बापरे … ! शुक्रवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 741 रूग्ण वाढले, पाच जणांचा मृत्यू ; आजवरची  कोरोनाबाधितांची एकूण संख्या झाली 50 हजार 318

पंढरपूर – जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून आलेल्या अहवालानुसार शुक्रवार 9 एप्रिल रोजीच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये (सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 741कोरोना रूग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 206 आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली असून ग्रामीणमध्ये शुक्रवारी 7056 चाचण्या झाल्या असून यापैकी 6315 चाचण्या निगेटिव्ह तर 741 पॉझिटिव्ह आहेत. आज 418 जणांनी कोरोनावर मात केली तर पाच जण मयत आहेत. आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये 50 हजार 318 रूग्ण आढळून आले असून 1276 जणांनी प्राण गमावले आहेत तर 44 हजार 430 जण या आजारातून बरे झाले आहेत.सध्या 4612 जणांवर उपचार सुरू आहेत.
आजच्या अहवालानुसार सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 206, पंढरपूर 144 तर यापाठोपाठ माळशिरस 143, करमाळा 58 तर माढा 57 अशी नोंद आहे. आज ग्रामीणमध्ये पाचजण कोरोनामुळे मयत असून यात बार्शी तालुक्यात 2, तर माळशिरस, दक्षिण सोलापूर व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.
आजवर पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले असून शुक्रवारी शहरात 60 तर ग्रामीणमध्ये 84 कोरोनाबाधित वाढले आहेत. येथील एकूण संख्या 9640 इतकी झाली असून आजवर या आजारात 254 जणांनी प्राण गमावले आहेत. सध्या 686 जणांवर उपचार सुरू असून 8700 जणांनी या आजारावर मात केली आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!