भागवताचार्य कै. वा.ना.उत्पात यांच्या अस्थींचे भावपूर्ण वातावरणात चंद्रभागेत विसर्जन

पंढरपूर – भागवताचार्य व स्वा.सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक, विचारवंत कै. वा.ना. उत्पात यांच्या अस्थींचे हरिनामाचा जयघोष करत भावपूर्ण वातावरणात बुधवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी चंद्रभागेत विसर्जन करण्यात आले.

अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील शेकडो पंढरपूरकरांनी चंद्रभागे तिरी गर्दी केली होती. कट्टर सावरकरभक्त, विचारवंत निर्भिड वक्ते अशी ओळख असलेल्या उत्पात यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सोमवार २८ सप्टेंबर रोजी उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचाअ स्थी कलश पंढरपूर येथे आणण्यात आला होता.

काल मंगळवारी दिवसभर त्यांच्या निवासस्थानी आणि सावरकर वाचनालयामध्ये अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजता
कै. उत्पात यांच्या श्री विठ्ठल मंदिरा जवळील निवासस्थानाजवळ चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले यांच्यासह अनेक महाराज मंडळी, वारकरी फडकरी यांच्या उपस्थितीत हरिनामाचा जयघोष करण्यात आला. तेथून श्री विठ्ठल मंदिराला वळसा घालून महाद्वार घाटावरून अस्थिकलश चंद्रभागा वाळवंटात भक्तराज श्री पुंडलिक
मंदिराजवळ आणण्यात आला.

वारकरी परंपरेप्रमाणे अभंग म्हणण्यात आले. त्यानंतर
कै. उत्पात यांचा मुलगा माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात , पुतणे गणेश उत्पात यांनी शोकाकुल वातावरणात चंद्रभागेत अस्थींचे विसर्जन केले.

81 thoughts on “भागवताचार्य कै. वा.ना.उत्पात यांच्या अस्थींचे भावपूर्ण वातावरणात चंद्रभागेत विसर्जन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!