भाळवणी पंचायत समिती गटात शिवसेनेच्या वतीने मोफत आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वितरण

भाळवणी – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी गटातील जैनवाडी धोंडेवाडी गावात शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या वतीने आर्सेनिक अलबम -३० या गोळ्याचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी शिंदे म्हणाले , सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पंढरपुरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी या गोळ्यांचा उपयोग होत आहे.यावेळी जैनवाडीतील ५०० कुटुंब व धोंडेवाडी तील ८०० कुटुंबाना गावातील आशा,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने या गोळ्याचे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक पवार, जैनवाडीचे सरपंच हणमंत सोनवणे,विलास गोफणे, अशोक मिरजे,किरण दानोळे,नागनाथ खरात, धोंडेवाडीचे सरपंच संभाजी देठे,औदुंबर देठे, लक्ष्मण देठे,ब्रह्मदेव इंगळे,पोलीस पाटील तानाजी जाधव,बापूराव गायकवाड व सदस्य, ग्रामसेवक अविनाश ढोपे, भैय्या पटेल, महेश इंगोले, बबन साठे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!