मंगळवारी पंढरपूर तालुक्यात 46 रुग्ण वाढले, एकूण संख्या 1827

पंढरपूर – मंगळवारी ज 18 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 46 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.

आजच्या अहवालानुसार तालुक्यात 21 तर शहरात 25 रूग्ण वाढले आहेत.

पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1827झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण मरण पावले आहेत. यामुळे कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 33 झाली आहे. 1007 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 787 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!