मंगळवारी पंढरपूर तालुक्यात आढळले 97 कोरोनाबाधित रूग्ण, दोन जणांचा मृत्यू

पंढरपूर – जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून आलेल्या मंगळवार 6 एप्रिल रोजीच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून)483 कोरोना रूग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 97 आढळून आले आहेत तर दोनजण येथे मयत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली असून ग्रामीणमध्ये मंगळवारी 7682 चाचण्या झाल्या असून यापैकी 7199 चाचण्या निगेटिव्ह तर 483 पॉझिटिव्ह आहेत. आज 599 जणांनी कोरोनावर मात केली तर पाच जण मयत आहेत. आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये 48473 रूग्ण आढळून आले असून 1261 जणांनी प्राण गमावले आहेत तर 43 327 जण या आजारातून बरे झाले आहेत.सध्या 3885 जणांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या अहवालानुसार सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 97 तर यापाठोपाठ माढा 86, बार्शी 79, करमाळा 65 अशी नोंद आहे. आज ग्रामीणमध्ये पाचजण कोरोनामुळे मयत असून यात पंढरपूर व बार्शी तालुका प्रत्येकी 2 व उत्तर सोलापूरमधील एकाचा समावेश आहे.

आजवर पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले असून मंगळवारी शहरात 48 तर ग्रामीणमध्ये 49 कोरोनाबाधित वाढले आहेत. येथील एकूण संख्या 9266 इतकी झाली असून आजवर या आजारात 253 जणांनी प्राण गमावले आहेत. सध्या 488 जणांवर उपचार सुरू असून 8525 जणांनी या आजारावर मात केली आहे.

One thought on “मंगळवारी पंढरपूर तालुक्यात आढळले 97 कोरोनाबाधित रूग्ण, दोन जणांचा मृत्यू

  • March 17, 2023 at 1:23 am
    Permalink

    Hi there! I just wanted to ask if you ever have any issues with hackers? My last blog (wordpress) was hacked and I ended up losing several weeks of hard work due to no back up. Do you have any methods to protect against hackers?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!