मंगळवेढा तालुक्यातील 39 गावांसाठीची भोसे पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरु करण्याची शैला गोडसे यांची मागणी

पंढरपूर, – मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 39 गावांसाठीची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात महिन्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही योजना तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा नेत्या शैला गोडसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने 39 गावासाठी राबविण्यात आलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे 31 मे 2020 अखेरीस हस्तांतरण करण्यात आले असून ती आता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. परंतु योजना वर्ग झाल्यापासून आजतागायत या भागातील लोकांना पाणी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांसह ग्रामपंचायतीला येथील पाणीपट्टीचा विनाकारण भुर्दंड सहन लागणार आहे. गतवर्षी समाधान समाधानकारक पावसामुळे उजनी धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे या योजनेला पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही. मात्र प्रशासनाकडून मात्र योजना बंद ठेवून सोयीस्कररित्या जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील महिन्यात उन्हाळ्यामुळे सुरू होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता सदरची योजना तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात व आपण यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!