मंगळवेढ्यात 6 हजार 144 ब्रास वाळूचा होणार लिलाव ,किंमत दोन कोटी 27 लाख 35 हजार ₹
पंढरपूर, – मंगळवेढा तालुक्यात जप्त केलेल्या 6 हजार 144 ब्रास अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार23 मार्च उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे. या वाळूची किंमत दोन कोटी 27 लाख रूपये इतकी आहे.
मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर केलेल्या कारवाईत तसेच सिध्दापूर येथे सन 2018-19 मधील संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावामधील एकूण सुमारे 6 हजार 144.84 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव करण्यात येणार असून, हा साठा सिध्दापूर येथे 4 हजार 644.84, माणनदी पात्रातील गट नं.89 येथे 500 ब्रास, ढवळस माण नदीतील विहिरी शेजारी 1 हजार 500 ब्रास असा ठेवण्यात आला आहे. याची किंमत दोन कोटी 27 लाख 35 हजार 908 रुपये इतकी आहे.
Great post. I am facing a couple of these problems.