मनसेकडून पंढरीत 9 हजार गणेशमूर्तींचे वितरण, उपक्रमाचे राज ठाकरेंकडून कौतुक

पंढरपूर,- कोरोनाच्या संकटकाळात मनसेने पंढरपूर व परिसरातील गरजूंना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे गेले अनेक दिवस वितरण केले तर आता गणेशोत्सवात मागणी करेल त्या गणेशभक्ताला घरात प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री गणेशमूर्ती मोफत देण्याचा उपक्रम राबविला व यास चांगला प्रतिसाद मिळाला. 9 हजार 368 घरांमध्ये कार्यकर्त्यांनी जावून या मूर्ती पोहोच केल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी कोरोनाच्या काळात लॉकडॉऊन पुकारल्यावर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी जावून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले होते. आता गणेशोत्सवात मोफत गणेशमूर्ती देण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मनसेने ही योजना आखली होती. या आवाहनाला गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दिवसात शंभर कार्यकर्त्यांनी शहरातील घरोघरी जावून 9 हजार 368 भक्तांना गणेश मूर्तीचे मोफत वितरण केले. यासाठी कार्यकर्त्यांचे दहा गट तयार करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील प्रत्येक भागात फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कार्यकर्त्यांनी गणेश मूर्तींचे वितरण केले. या मूर्ती पर्यावरणपूरक असून त्या शाडूमाती व नैसर्गिक रंगाचा वापर करून तयार करण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद, पेण,सोलापूर या ठिकाणाहून गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. येथील मनसे कार्यकर्त्यांनी राबवलेल्या मोफत गणेशमूर्ती उपक्रमाचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक करत सर्व गणेशभक्तांना व कार्यकर्त्यांना गणेश चतुर्शीच्या शुभेच्छा दिल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली. यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्‍वर गरड, सागर घोडके, महेश पवार, नागेश इंगोले, प्रताप भोसले,अभिजित डूबल,अवधूत गडकरी,कुणाल पवार, पूजा माळी, रोहन पंढरपूरकर उपस्थित होत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!