महिला बचत गटाची चळवळ सुरू राहण्यासाठी मनसेची धडपड, दिलीप धोत्रे यांच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी याप्रश्नी घातले लक्ष

पंढरपूर – मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोनामुळे सर्व ठिकाणचे व्यवसाय ठप्प झाले होते. यामुळे विविध बँका आणि महिला बचत गटांच्या कर्जाचे हप्ते थकित झाले होते. या परिस्थितीत अनेक व्यवसाय सुरू नसल्याने अजूनही काही महिने ही वसुली थांबवावी अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे. दरम्यान मनसे आक्रमक झाल्याने व संभाव्य आंदोलन पाहता मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुली तगादा कमी केल्याचे चित्र आहे.बचत गटाची रक्कम मिळताना विमा म्हणून काही पैसे कंपन्या काढून घेतात ,त्यामुळे या कोरोनाच्या वाईट परिस्थितीत तो विमा लागू करून महिलांचे कर्ज जमा करून त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देऊन ही महिला बचत गटाची चळवळ सुरू ठेवावी अशी मागणी मनसेने लावून धरली आहे.
याबाबत मनसेचे दिलीप धोत्रे यांनी मागील चार महिन्यापासून अडचणीत आलेल्या या बचत गटाच्या महिलाना सवलत देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे, त्यामुळे अनेक महिला बचत गटांच्या महिलानी आभार मानले आहेत.
राज ठाकरे यांच्या मनसेची ओळख सर्वांनाच आहे. एखाद्या विषयावर जर मनसेने लक्ष घातले तर तो विषय निकालात काढण्याचे काम केले जाते. त्यामुळे हा कर्जवसुली तगाद्याचा विषय दिलीप धोत्रे यांनी राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविला आहे. त्यामुळे लवकरच राज ठाकरे याबाबत निर्णय घेऊन याबाबतीत आवाज उठवून महिलांना दिलासा देतील अशी आशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!