माघ कृ.2 निमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट, सण-उत्सवाला फुलांची आरास करून देण्यासाठी भाविकांकडून मोठा प्रतिसाद

पंढरपूर – मागील काही महिन्यांपासून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सण, यात्रा, उत्सव व राष्ट्रीय दिनी विविध फुलांची आकर्षक आरास करण्यात येत आहे व यास भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक भाविक ही सेवा बजावण्यासाठी पुढे येवू लागले आहेत. सोमवार 1 मार्च रोजी माघ कृ.2/3 चे औचित्य साधून श्रीकांत घुंड व काळूराम थोरात यांनी एक टन फुल देवू केली आहेत.
झेंडू,शेवंती, बिजली,ऑरकेड, गुलाब, जरबेरा यासारख्या फुलांची आरास मंदिरात करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी भागातील वडगाव घेनंद येथील सिध्दी डेकोटर्सच्या वतीने मंदिरात एक टन फुलांची सजावट करण्यात आली आहे. आकर्षक रंगसंगती करून केली जाणारी ही आरास अलिकडच्या भाविकांना खूप आवडते. यासाठी किमान 51 हजार रूपये खर्च येतो.

दरम्यान कोरोनाकाळात मंदिर बंद असतानाही समितीने प्रत्येक उत्सव व राष्ट्रीय दिनी श्री विठ्ठल व रूक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली. यात्राकाळात भाविकांना दर्शन बंद होते मात्र देऊळ आकर्षक रोषणार्इने सजलेले असायचे. दूरचित्रवाणी व सोशल मीडियाच्या माध्यमातून येथील सजावट सर्वत्र क्षणार्धात पोहोचत होती. यामुळे घरबसल्या भक्तांना ही आरास पाहण्याची सोय होत आहे.
मंदि समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व सदस्य व अन्य अधिकारी यासाठी प्रयत्न करत असतात. मंदिराला ऑनलाइन देणग्या देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. सभामंडप व पाच परिवार देवता मंदिरांच्या जीर्णोध्दारासाठी एक कोटी रूपयांहून अधिक रक्कम भक्तांनी देणगीस्वरूपात देवू केली आहे. मंदि समितीने देखील सामाजिक भान ठेवत कोरोनाकाळात मंदिर बंद असताना व उत्पन्न ठप्प झाल्यावर देखील अनेक दिवस गरजूंना अन्नदान केले, आरोग्य यंत्रणेला कोरोनाविरोधात लढण्यासाठी यंत्रसामुग्रीसाठी निधी दिला तसेच अनेक उपाय योजनांमध्ये सहाय्य केले आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!