मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वाहनाने महापूजेसाठी पंढरीत येणार

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय)

मा. मुख्यमंत्री महोदय आज सोमवार 19 जुलै रोजी दुपारी दोननंतर वाहनाने पंढरपूरकडे रवाना होत आहेत.
उद्या मंगळवार 20 जुलै रोजी पहाटे सव्वा दोन वाजता मा. मुख्यमंत्री महोदय हे सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील.

मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आपल्या कुटुंबासह वाहनाने मुंबईहून पंढरपूरला आज १९ जुलै रोजी येत आहेत. ते उद्या २० रोजी पहाटे आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल रूक्मिणी ची शासकीय महापूजा करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी ही ठाकरे हे स्वतः वाहन चालवित पंढरपूरला आले होते. उद्या महापूजेनंतर श्री. ठाकरे हे सकाळी अकरा वाजता पंढरपूरहून मुंबईसाठी परत निघणार आहेत. सायंकाळी सात वाजता ते मातोश्री निवासस्थानी पोहोचतील.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!