..म्हणूनच खासदार शेट्टी सामान्यांना आपले वाटतात

खोची ता. हातकंणगले येथील वैभव दाडमोडे वय वर्षे ३० हा अडीच फुट उंचीचा मुलगा दिव्यांग असून खोची येथील चौकामध्ये छोटीशी पानपट्टी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. पानपट्टीचे साहित्य आणण्यासाठी पेठवडगांव याठिकाणी जावे लागते. एस. टी ने प्रवास करणे अडचणीचे असल्याने त्यास राजू शेट्टी यांच्या खासदार निधीतून गाडी देण्यात आली आहे. या गाडीने त्याच्या पुढील जीवनात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाडा निश्चितच गती घेईल. असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व नेहमीच सामान्य जनता, शेतकरी यांना आपलेसे वाटते. मतदारांनी त्यांना जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार केले आहे. त्यांचे विरोधक ही त्यांचे नाव आदराने घेतात.

11 thoughts on “..म्हणूनच खासदार शेट्टी सामान्यांना आपले वाटतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!