यात्रा अनुदानातून पंढरीत प्रदक्षिणा मार्गावर पावणे चार कोटीचे काँक्रिटीकरण व कराड रस्त्यावर पथदिव्यांसाठी 70 लाखांची तरतूद

पंढरपूर– यात्रा अनुदानामधून प्रदक्षिणा मार्गवर 3 कोटी 79 लाखाचे काँक्रिटीकरण व तालुका पोलीस स्टेशन ते ठाकरे चौक येथील नवीन झालेल्या काँक्रिट रस्त्यावर पथदिवे बसविण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली

महाराष्ट्र शासनाने नगरपरिषदेस यात्रा अनुदानापोटी पाच कोटी रुपये मंजूर केले होते.यातून शहरातील विविध कामे करणे अपेक्षित असते. त्यानुसार शासनाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन अधिकारी, नगराध्यक्ष साधना नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची समिती गठित केली असून याची बैठक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संपन्न झाली. यात शहरामध्ये येणारा प्रत्येक भाविक हा प्रदक्षिणा मार्गावरुन जात असतो याचा विचार करुन प्रदक्षिणा मार्गावरील कालिका देवी चौक ते चौफाळा ते नाथ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता काँक्रिटीकरणे करण्यासाठी 3 कोटी 79 लाख रूपये तसेच तालुका पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालय ते ठाकरे चौक ते राम मंदिर व पुढे दत्तनगर या ठिकाणी झालेल्या काँक्रिट नवीन रस्त्यावर पथदिवे बसविण्यासाठी 70 लाख रूपयांच्या कामास मंजुरी दिली आहे.

तसेच कोरोनाविषाणूमुळे प्रतीकात्मक पद्धतीने भरण्यात आलेल्या आषाढी, कार्तिकी, माघी यात्रा कालावधीमध्ये साफसफाई करणे, जंतूनाशक फवारणी, वाखरी पालखी तळावर ईओसी सेंटर उभा करणे व इतर कामासाठी 52 लाख रुपये मंजूर करण्यात आले. वरील सर्व कामे करण्याबाबत आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सूचना दिल्या होत्या.

्र काही सामाजिक संघटनांनी यात्रा अनुदानामधून पंढरपूर शहरातील नागरिकांचा कर माफ करावा अशी मागणी केली होती. सदरचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने शासनाकडे पाठवण्यात आला होता. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. यात्रा अनुदानामधून कर माफ करता येईल का यासाठी प्रयत्न करण्यात आले.याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे. शासन निर्देशानुसार व दिलेल्या निकषानुसार यात्रा अनुदानातून कराची रक्कम माफ करता येणार नाही. यासाठी शासनस्तरावर वेगळा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या कर माफीबाबत शासनस्तरावर नगरपरिषद वेगळा प्रयत्न करीत असल्याची माहिती नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांनी दिली.

2 thoughts on “यात्रा अनुदानातून पंढरीत प्रदक्षिणा मार्गावर पावणे चार कोटीचे काँक्रिटीकरण व कराड रस्त्यावर पथदिव्यांसाठी 70 लाखांची तरतूद

  • March 6, 2023 at 4:20 am
    Permalink

    Gaylene Pecora roared You mean I m a shrew buy cialis online com 20 E2 AD 90 20Paracetamol 20And 20Viagra 20Interaction 20 20Viagra 20Gel 20Sachets 20Online paracetamol and viagra interaction U

  • March 17, 2023 at 9:00 am
    Permalink

    Hey very cool web site!! Guy .. Beautiful .. Wonderful .. I’ll bookmark your blog and take the feeds additionally?KI’m happy to find so many helpful info right here within the submit, we want develop extra strategies on this regard, thank you for sharing. . . . . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!